अपंगत्वावर मात करत डॉ. तेजस ठाकूर यांनी मिळवली एम.डी.ची पदवी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील डॉ.तेजस ठाकूर वानखेडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत एम.डी.(आयु) परीक्षेत उत्तीर्ण होत नेत्रदिपक यश संपादन केले आहे.

तेजस याच्या मोठ्या बहीण भावाने डॉक्टर होत आई वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आदर्श घरातच निर्माण आहे. तेजस यांनी आपल्या अपंगत्वाची पर्वा न करता डॉक्टर होण्याची जिद्द बाळगली. आई मुख्याध्यापिका पुष्पा वानखेडे,वडिल निवृत्त नायब तहसीलदार दिलीप वानखेडे तसेच मोठे बंधू अमळनेर येथिल नेत्ररोग तज्ञ डॉ.कौस्तुभ वानखेडे हे भक्कमपणे पाठीशी उभे राहिल्याने डॉ.तेजस याने एम.डी.(आयु.) मध्ये नेत्रदिपक यश संपादन केले आहे. नेत्रदीपक अशा यशानंतर डॉ.तेजस यांनी आपल्या तालुक्यातील गरजू रुग्णांना सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. डॉ.तेजस च्या यशाबद्दल महाराष्ट्र ठाकूर समाजचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ठाकूर, राज्य सरचिटणीस रणजित शिंदे,जिल्हाध्यक्ष गोपाळराव ठाकूर,अमळनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर,मोठी भगिनी डॉ.स्वरूपराणी ठाकूर आदिसह समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content