लोंढवे येथील माध्यमिक विदयालयातील दोन विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र


अमळनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस.एस. पाटील माध्यमिक विद्यालय मधील दोन विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (N.M.M.S.) परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय परीक्षा परिषद केंद्र सरकार अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेला एकूण नऊ विद्यार्थी बसले होते, त्यात आठवीतील भावेश सतीलाल पाटील व अजय गुलाब खैरनार या विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे विद्यार्थी गरीब होतकरू असून या शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र झाले.

या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अंतर्गत बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये या प्रमाणे येत्या चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहेत. या गुणी विद्यार्थ्यांना शाळेतील ज्येष्ठ उपशिक्षक महेश लालचंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व गुणी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळेचे चेअरमन माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, मुख्याध्यापक तथा भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान करून कौतुक केले आहे. तसेच लोंढवे गावाचे सरपंच कैलास दामू खैरनार यांच्यासह ग्रा.पं. सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content