अतिवृष्टीचे पैसे या आठवड्यातच होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी दसरा व दिवाळी हे सण लक्षात घेता शेतकरी बांधवाना अतिवृष्टीचे आलेले अनुदान तात्काळ खात्यावर वितरित व्हावे. अशा सूचना आ.अनिल पाटील यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना केल्या.

अमळनेर मतदारसंघात पातोंडा सर्कल मधील गावांचे २०२२ मधील अतिवृष्टीचे अनुदान आणि २०१९ मधील ४० गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले असून केवळ तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळण्यास विलंब होत आहे.

मात्र दसरा सण तोंडावर आल्याने आमदारांनी तहसीलदारांच्या अनुदान वितरण कामकाजाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी हे सण आनंदात जाण्यासाठी या कामकाजास वेग देऊन दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कशी पडेल ती व्यवस्था करावी. अशा सूचना केल्या. यावर तहसीलदारांनी या आठवड्यात संपुर्ण अनुदान वितरण झालेले असेल अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांना दिली.

Protected Content