अतिक्रमण हटाव पथकाचे ट्रॅक्टर पेटवण्याचा फेरीवाल्याचा प्रयत्न (व्हिडिओ)

जळगाव : प्रतिनिधी । आज महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक फुले मार्केट परिसरात कारवाई करत असताना एका फेरीवाल्याने संतापात  अतिक्रमण हटाव पथकाच्या ट्रॅक्टरवर पेट्रोल टाकून ते  पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याने वाद विकोपाला गेला  होता

 

आज महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक फुले मार्केट भागात फेरीवाल्यांना हटवत असताना या पथकातील कर्मचाऱ्यांशी त्या फेरीवाल्याने आधी वाद घातला मात्र कोणत्याही परिस्थितीत कारवाई करणारच अशी भूमिका या पथकातील कर्मचाऱ्यांनी घेतली होती . त्यानंतर त्या फेरीवाल्याने संताप व्यक्त करत स्वतःच  या पथकाच्या ट्रॅक्टरवर पेट्रोल टाकत  ते पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर थोडा वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती . या गोंधळातच अतिक्रमण हटाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली पोलीस आल्यावर त्याला शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले तेथे  त्या फेरीवाल्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल  केली जाणार होती

 

ज्ञानेश्वर कोळी, साहेबराव शंखपाळ, किशोर सोनवणे, सुनीता सोनवणे, आशाबाई रानोळे, नितीन भालेराव, राजू कोळी परमेश्वर सोनवणे, सतीश ठाकरे  यांचा  या अतिक्रमण हटाव पथकात समावेश होता.

दरम्यान  हे कृत्य करणाऱ्या फेरीवाल्याशी आमच्या संघटनेचा काहीही संबंध नाही तो आमच्या संघटनेचा सदस्य नाही त्याने केलेल्या कृत्याचा आम्ही निषेध करतो असे जळगाव हॉकर्स असोसिएशन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाग १

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1916765608500262
भाग २

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/508475463807030

भाग ३

https://www.facebook.com/508992935887325/videos/572939537454375

Protected Content