अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून बापलेकाला मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांलिका माता नगरातील हॅपी होम कॉलनीत अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून बापलेकाला चार जणांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, अविनाश तुकाराम पगारे (वय-४०) रा. हॅपी होम कॉलनी, कालिंका माता मंदीराजवळ जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. १८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जळगाव महानगरपालिकेच्या पथकाने हॅपी कॉलनीत अतिक्रमण काढण्याचे काम सुरू केले. त्यावेळी त्यांच्या गल्लीत राहणारे प्रशांत सुरेश कुवर, तेजस प्रशांत कुवर, आशिष प्रशांत कुवर, सरीता प्रशांत कुवर सर्व रा. कालिंका माता मंदीराजवळ, हॅप्पी होम कॉलनी यांनी अविनाश पगारे यांना शिवीगाळ करून घरात अनधिकृतपणे प्रवेश करत  वडील तुकाराम पगारे यांनी मारझोड केली. यात बापलेक दोघे जखमी झाले आहे. अविनाश पगारे यांच्या फिर्यादीवरून रात्री ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे. 

Protected Content