मुंबई : वृत्तसंस्था । शेअर बायबॅकमध्ये प्रेमजी यांनी ९१५६ कोटी रुपयांचे शेअर विकले. त्यानंतर त्यांची भागीदारी ७४ टक्क्यांवरुन घसरुन ७३ टक्के झाली आहे
देशातील मोठी आयटी कंपनी विप्रोचे फाऊंडर चेअरमन अजीम प्रेमजी आणि प्रोमोटर ग्रूपने २२ . ८ टक्के शेअर बायबॅक ऑफरमध्ये विकले आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विप्रोने ९५०० कोटी रुपयांचे शेअर बायबॅक ऑफर उघडलं होतं. या प्रोग्रामअंतर्गत कंपनीने ४०० रुपये प्रती शेअरच्या दराने २३ . ७५ कोटींचे इक्विटी शेअर विकत घेतले होते.
प्रेमजी यांचे दोन परोपकारी ट्रस्ट आहेत. ‘अजीम प्रेमजी ट्रस्ट’ आणि ‘अजीम प्रेमजी परोपकारी पहल’ यामधून ७ ८०७ कोटी रुपये कमावतील. यामुळे ते भारतातील सर्वात मोठं चॅरिटेबल ट्रस्ट बनेल.
हा ट्रस्ट शिक्षण, पोषण आणि अपंग व्यक्ती, स्ट्रीट चिल्ड्रेन, घरगुती हिंसाचारातून बचावलेल्यांसह असुरक्षित गटांना मदत करत आहे. या क्षेत्रात पैसा लावून अशा लोकांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे.
आयटी कंपनी विप्रोचे अजीम प्रेमजी दानधर्माच्या कामात मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात परोपकारी कामांमध्ये प्रत्येक दिवशी २२ कोटी रुपये म्हणजेच एकूण ७९०४ कोटी रुपयांचं दान दिलं.
नुकतंच विप्रो चेअरमन रिशद प्रेमजी यांनी आपल्या आई-वडिलांसह आजीची एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला. “माजी आजी डॉ. गुलबानो प्रेमजी, माझे आई-वडील अमलनेर येथे होते . त्या १९६६ – ८३ ते विप्रोच्या चेअरमन आहेत आणि सुरुवातीच्या वर्षांमध्ये माझ्या वडिलांना त्यांचं मोठं समर्थन होतं. माझ्या ओळखीतल्या त्या सर्वात जास्त उदार व्यक्ती होत्या. त्यांच्या मूल्यांनी विप्रोच्या परोपकाराच्या आदर्शांना आकार दिला”, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं