साकळी येथील सखी महिला मंडळाच्या आदिवासी वस्तीवर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

यावल प्रतिनिधी । येथील सखी महिला मंडळाच्या वतीने मकरसंक्रातिनिमित्त विटवा ता.यावल येथील आदिवासी पाड्यावर जाऊन त्या ठिकाणी आदिवासी माहिलांसाठी ‘ हळदी-कुंकवातून सामाजिक सुसंवाद ‘या कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

याप्रसंगी सांस्कृतिक दर्शनातून विविध असे कार्यक्रम घेण्यात आले. यात उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमाता तसेच आदिवासीनायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित आदिवासी महिलांना हळदीकुंकू देऊन त्यांना भेटवस्तू दिली आणि त्यांच्याशी सामाजिक व सांस्कृतिक सुसंवाद साधला. या उपक्रमासाठी वनवासी कल्याण आश्रमचे जिल्हा समन्वयक विरसिंग पावरा(यावल) यांचे अनमोल सहकार्य मिळाले. सदर उपक्रमासाठी सखी महिला मंडळाच्या पदाधिकारी अंजली नेवे, मनीषा नेवे, शैला नेवे, मानसी नेवे, नीलिमा नेवे यांनी परिश्रम घेतले. अंजली नेवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रास्ताविक मानसी नेवे यांनी केले. ‘उत्सवातून – सामाजिक सुसंवाद’ हा उपक्रम राबविल्याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Protected Content