नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयोगात्मक अवस्थेत असणारी व्हाटअॅपची पेमेंट सिस्टीम भारतात पूर्णपणे लाँच करण्यात आल्याची घोषणा मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे.
गेल्याच महिन्यात या अॅपचे लाँचिंग झाल्याचे फेसबुकचे संस्थापक आणि व्हॉट्सअपचेही मालक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं. डिजिटल इंडिया या प्लॅटफॉर्मवर संवाद साधताना मार्क यांनी रिलायन्स इंडियाचे प्रमुख मुकेश अंबानींशी चर्चा केली. त्यावेळी, यासंदर्भात माहिती दिली.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयने व्हाटपअॅ पे भारतात लाँच करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर, काही टप्प्यात हे लाँच केले जात आहे. त्यातच, मार्क झुकरबर्ग यांनी भारतात गेल्याच महिन्यात व्हॉट्सअप पे लाँच केल्याची माहिती दिली. पार्टनरींग फॉर डिजिटल इंडियाद्वारे रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याशी झुकरबर्ग यांनी संवाद साधला. त्यावेळी, भारतात व्हॉट्सअप पे लाँच केल्याचे सांगत, केवळ युपीए कार्यप्रणाली आणि १४० बँकांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे. भारतात असे प्रयोग करायला भारत हा प्रधान्यक्रमाने पहिला देश ठरतो, असेही झुकरबर्ग यांनी यावेळी म्हटलं.