जामनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आपल्या कामात कुचराई करणाऱ्या जामनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आतातरी पंचायत समितीचा कारभार सुधारेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जामनेर पंचायत समितीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. दरम्यान गट विकास अधिकारी नेहमी कामकाजात कुचराई केल्याचे ठपका ठेवत अखेर जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची बदली करण्यात आली आहे. तत्पूर्वी पंचायत समितीमध्ये देवाण-घेवाण झाल्याशिवाय कोणतीच कामकाज होत नसल्याच्या तक्रारी नेहमी होत होत्या. व शेवगा पिंपरी येथील एका लाभार्थ्याला गोठ्याचे पैसे मागणे केले म्हणून त्यांनी थेट लाचलुचपथक विभागाकडे तक्रार केली होती. पंचायत समितीमध्ये लाचलुचपत विभागाने रोजगार हमी योजनेला व टेबल वरती काम करणारे क्लर्क वसंत भारी यांना रंगेहाथ पकडल्याने पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली होती. आणि त्यांनी त्यांच्या जबाबा मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला जामनेर पंचायत समितीच्या प्रणाली बाबत माहिती दिल्याचे समजते. त्यावरून गटविकास अधिकारी देखील यात सामील असल्याची चर्चा होती. सदर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांची बदली फुलंब्री येथे झाली आहे. या प्रकारामुळे मात्र जामनेर पंचायत समितीतील कारभार थंडावला असून लोकांची काम होत नसल्याने लोक चक्रा मारत आहे. लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन पंचायत समितीतील कारभार नियमित व स्वच्छ कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आता तालुक्यातून बोलले जात आहे.