जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यासंदर्भात मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचा मुलगा,अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली.

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असलेल्या रमेश देव यांनी मराठी व हिंदी चित्रपटातील अभिनय करत आपली एक स्वतंत्र छाप सोडली. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे रमेश देव यांना जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी जन्म झाला. सन १९५६ साली प्रदर्शित झालेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर बॉलीवूडमधील ‘आरती’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

रमेश देव विशेष ओळख मिळाली ती ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेद्वारे. त्यांनी दिग्दर्शनासह अनेक नाटकं आणि मालिकांची आणि नाटकांची निर्मिती केली. अनेक चित्रपटात आपली सह अभिनेत्री असलेल्या सीमा देव यांच्यासोबत १९६२ साली रमेश देव विवाहबध्द झाले. रमेश देव यांनी आतापर्यंत २८० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं. वृद्धापकाळाने गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज बुधवार, दि.२ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

Protected Content