जळगाव प्रतिनिधी । शहरातील अक्सानगरातील इकबाल हॉल येथून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीच्या बांधकाम करण्याच्या सेंटींगच्या कामाच्या प्लेटा चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुबश्शिर शेख सादीक (वय-२६) रा. अक्सानगर हे सेंटींग काम करतात. त्यांच्याकडे बांधकामासाठी लागणारे साहित्य आहेत. त्यात स्लॅबसाठी लागणारे लोखंडी प्लेटाही आहे. सध्या त्यांचे अक्सानगरातील ईकबाल कॉलनीत बांधकामाचे काम सुरू आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी रात्री ७ ते १६ जानेवारी २०२१ दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बांधकामाच्या ठिकाणाहून २० हजार रूपये किंमतीचे लोखंडी ४० प्लेटा चोरून नेल्या. परिसरात तपास करूनही कोणताही शोध न लागल्याने अखेर ४ मार्च रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली आहे. तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.