बॅरीस्टर चौकात चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील बॅरीस्टर निकम चौकात चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील समतानगर परिसरातील धामणगाव वाडा येथील राहूल रविंद्र सोनवणे वय २८ हा तरुण त्याच्या दुचाकीने बॅरीस्टर निकम चौकातून जात होता. याचदरम्यान त्याच्या दुचाकीला भरधाव एम.एच.१९ या क्रमाकांच्या चारचाकीने धडक दिली. यात दुचाकीस्वार राहूल सोनवणे हा जखमी झाला. तर त्याच्या दुचाकीचेही या अपघातात नुकसान झाले. अपघातानंतर मदत न करता वाहनचालक निघून गेला. उपचारानंतर राहूल सोनवणे याने सोमवार, ४ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिसात वाहनचालकाविरोधात तक्रार दिली. त्यावरुन चारचाकी वाहनावरील मनोज झंवर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सोनवणे हे करीत आहेत.

 

Protected Content