शिवकॉलनीत बंद घर फोडून १० हजाराची रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी येथील बंद अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील १० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना गुरूवार ४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, चंद्रकांत मोहन बाविस्कर (वय-३०) रा. शिव कॉलनी हे हातमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २ मार्च रोजी नातेवाईकांकडे कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून मध्यरात्री घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले १० हजार रूपयांची रोकड लांबविली. चंद्रकांत बाविस्कर हे गावाहून परत आल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. घरात जावून पाहिले असता कपाटातील रक्कम दिसून आली नाही. चंद्रकांत बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेहेकॉ उषा सोनवणे करीत आहे. 

Protected Content