जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यात म्हसावद गावाजवळील पद्मालय देवस्थान येथे अंगारकी चतुर्थी निमित्त मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून भाविकांनी गणपती दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
या मंदिराची ख्याती अशी की, पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते या स्वयंभू गणेशाची कमळाच्या तलावातून निर्मिती झाल्याचे बोलले जाते . प्राचीन काळातील हे मंदिर आहे श्री गणेशाच्या अंगारकी चतुर्थीला राज्यभरातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्यासाठी येथे गर्दी केली जाते. यामध्ये ग्रामीण भागासह राज्यभरातून भाविक भक्त येतात. या अनुषंगाने मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान गणपती दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.