जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील आदर्श नगरातील आरटीओ कार्यालयाजवळ पानटपरी फोडून दुकानातून रोकड आणि साहित्य चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता समोर आले आहे. या संदर्भात दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याला अटक करण्यात आली आहे.

गोपाल काशिनाथ पाटील (वय-४० रा. त्रिभुवन कॉलनी, जळगाव) हे आपले परिवारासह वास्तव्याला असून पानटपरी चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची आदर्श नगरात पानटपरी आहे. २३ ते २३ जानेवारी रोजीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची पानटपरी फोडून दुकानातून रोकड आणि इतर साहित्य चोरून नेले. ही घटना शुक्रवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ४ वाजता उघडकीला आली आहे. या संदर्भात त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपी सागर शिवराम डोईफोडे वय-२८, रा. रामेश्वर कॉलनी, याला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.