अंगणवाडी केंद्रातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एका शेतकऱ्याची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २८ जून रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वावडदा येथील शेतकरी योगेश पुंडलिक शिंदे (वय-४०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २६ जून रोजी रात्री ९ वाजता गावातील अंगणवाडी परिसरातील पत्र्यांच्या शेडमध्ये त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीई ९९७६) पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी २७ जून रोजी सकाळी उघडकीला आल. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी २८ जून रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहे.

Protected Content