हिरापूर शिवारात बेवारस मृतदेह आढळला!

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हिरापूर शिवारात एका स्त्री जातीचा बेवारस मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील स्त्री जातीचा मृतदेह आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व सदर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content