मोठी बातमी : भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; दुसरा बचावला

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अवजड वाहने रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्याने बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. तर सोबत असलेला एक जण थोडक्यात बचावला आहे. ही घटना मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताई महाविद्यालयसमोर घडली आहे. किसन उर्फ कृष्णा तलवारे (वय-३४) रा. बोदवड ता. मुक्ताईनगर ह.मु. इच्छापुर ता.मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर शहरातून गेलेल्या बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर एक भिषण अपघात झाला आहे. यावेळी अवजड वाहतूक करणारा ट्रक हा अवैधपणे रस्त्यांच्याकडून जात होता. मागून येणाऱ्या बस क्रमांक (एमएच १० डीएल ३५५५) ला आव्हरटेक करतांना दुचाकीने किसन तलवारे व सोबत तुळशीराम वानखेडे हे ने दोघेजण पुढे जात होते. त्यावेळी अचानक दुचाकीवरील ताबासुटल्याने दुचाकीस्वार हा बसच्या चाकाखाली आल्याने किसन तलवारे या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. तर सोबत असलेला तुळशीराम वानखेडे थोडक्यात सुदैवाने बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर शहरातील स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर अवजड वाहतूक करणारे वाहन घेवून चालक पसार झाला आहे.  या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

 

Protected Content