अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द ठार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावानजीकच्या खेडी कढोली फाट्याजवळ रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली होती.

वृध्दाच्या मृत्यूप्रकरणी गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर कडून फुलपगार (वय-४०) रा. पाळधी बुद्रुक ता.जि.जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर फुलपगार हे आपल्या परिवारासह पाळधी गावात वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता खेडी कढोली फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान अखेर महिन्याभरानंतर गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांची पत्नी सुमनबाई मधुकर फुलपगार यांनी पाळधी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालक विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.

Protected Content