आजीचे प्रेम व हातात १० रूपये टेकताच ॲड.रोहिणीताई गहिवरल्या… कारणही तसचं होतं !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांनी राजकारणाचा वारसा नसलेल्या सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन गावचे सरपंच शेतकी संघ व सलग 6 पंचवार्षिक आमदार विरोधी पक्षनेते, मंत्री असा प्रवास केला या चाळीस वर्षाच्या प्रवासात त्यांनी जो आपल्या जवळ काम घेऊन आला त्याला आपले मानून प्रत्येकाचे काम केले. या चाळीस वर्षात त्यांनी कोणतीही जातपात धर्मभेद गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता संपुर्ण मतदारसंघातील जनतेला आपला परीवार मानून कार्य केले.

प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी झाले जनसेवेसाठी व पक्ष विस्तारासाठी दिवस रात्र एक केला त्यातुन ते लोकनेते झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा वर्ग आहे याचा प्रत्यय नेहमी येत असतो. असाच अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांना उचंदा येथे आला त्या उचंदा येथे गेल्या असता एका म्हाताऱ्या आजीने त्यांना खाऊसाठी दहा रुपये दिले, त्याबद्दल त्यांनी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.

यात त्या म्हणतात “तळागाळातील शेवटच्या माणसांसाठी केलेल्या प्रामाणिक कार्याची पावती, ही त्या लोकांच्या आशीर्वादातून नेहमीच मिळत असते. अशा वेळी आलेला अनुभव हा खुप भावनाप्रधान तर असतोच मात्र आपल्या मनाला उभारी देणाराही असतो. गत चाळीस वर्षांपासून आदरणीय आ. एकनाथराव खडसे समाजासाठी काम करीत आहेत. या दीर्घ प्रवासात त्यांनी कधीही आपला-परका, धर्म, जात-पात असा भेदभाव केला नाही. त्यात आदरणीय खडसे,  तर वारकरी संप्रदायाचे भक्त… संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगीतल्याप्रमाणे ‘जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।।’ या उक्तीनुसार काम करीत राहीले.

यावेळी रोहिणी खडसे खेवलकर यांनी आपल्याला आलेला अनुभव कथन केलाय .. तो असा, त्यांच्या कार्याचे संचित काय? याचे प्रत्यय देणारा अनुभव आज मला आला. मतदारसंघात फिरत असतांना आज उचंदा या गावात गेली असता, तिथे एक आजीबाई भेटल्या. खडसे साहेबांची लेक म्हणून आजींनी माझे कौतुक केले, लेकुर-बाळांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी लगेच आपल्याकडी पुरचंडी काढून त्यातील दहा रुपयाची नोट माझ्या हातावर ठेवली. मला आश्चर्य वाटले. आजी पैसे का देताहेत? हा विचार मनात आला असतांनाच आजीबाई म्हणाल्या,

‘राहू दे तुझ्या मुलांना दे, खाऊ खायला’

मी म्हटले, ‘नको आजी, पैसे नका देऊ’

तर त्या रागावल्या व म्हणाल्या ‘माझा हक्क आहे तो. तुझ्यासाठी नाही देत. बाळांसाठी देतेय.’

जनसामान्यांचे हे प्रेम पाहून खरं तर गहिवरुन आलं. नंतर सावकाश आजींना समजविले व पैसे परत दिले. त्यांना मी म्हणाले,

‘आजी मला पैसे नको पण यापेक्षा जास्त काही पाहिजे’

त्यावर त्या म्हणाल्या ‘बेटा, मी गरीब बाई. यापेक्षा काय देऊ शकते?’

मी लगेच म्हणाले ‘आजी, मला पैशांपेक्षा तुमचे आशीर्वाद हवे. ते द्या. ते माझ्यासाठी अनमोल आहेत.’

मग आजींचेही डोळे भरुन आले. त्यांना नमस्कार केला, त्यांनीही भरभरुन आशीर्वाद दिलेत.

खरंच, जीवनात असे काही क्षण येतात जे गुंफुन ठेवावे असेच असतात. आज मी खरंच स्वत:ला खुप भाग्यवान समजले. मा. खडसे साहेबांनी कमावलेली खरी श्रामंती काय? याचा परिचय देखील झाल्याचे ॲड. रोहिणी खडसे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात , या प्रसंगा वरुन आ .एकनाथराव खडसे आणि खडसे परिवाराची  तळागाळार्यंतच्या लोकांसोबत किती घट्ट नाळ जुळलेली आहे हे दिसुन येते

Protected Content