वृध्द शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धरणगाव तालुक्यातील एका वृध्द शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.  रमेश विश्राम पाटील (वय-६०) रा. तरडे ता. धरणगाव असे मयत वृध्द शेतकऱ्याचे नाव आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रमेश पाटील हे सकाळी लवकर उठून शेतात वखरणीसाठी गेले होते. वखरणी केल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. यावेळी घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

Protected Content