वृद्ध महिलेची फसवणूक करत सोन्याची पोत लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गांधी मार्केटजवळ एका वृद्ध महिलेची फसवणूक करत गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेल्याची घटना उघडकिला आली आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भगीरथाबाई रामा बारी (वय-६५, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा जळगाव) या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० जून रोजी सकाळी १० वाजता वृद्ध महिला या जळगाव शहरातील गांधी मार्केट येथे उत्तम क्लाथ स्टोअर दुकानासमोर आल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना एक महिला व एक पुरुष भेटले. त्यांनी सांगितले की या कापडात २ लाख रुपये ठेवले आहे. असे सांगून वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर वृद्ध महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात शनिवारी १० जून रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहे.

Protected Content