Home क्राईम खामगावात पत्रकारास मारहाण (व्हिडीओ)

खामगावात पत्रकारास मारहाण (व्हिडीओ)

0
108


khamgaon

 

 

खामगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील बुलडाणा येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नुकतेच दिले आहेत.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील अग्रवाल फटाका केंद्र हे अवैध असल्याने तहसीलदार खामगाव यांचे पथक पोलिस कर्मचाऱ्यांसह अग्रवाल फाटा केंद्र सील करण्याची कारवाई करत असतानांचे वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेले पत्रकार शिवाजी भोसले यांना सुनील अग्रवाल, संगीत अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत भोसले यांचा मोबाईल फोडला आहे.
याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी पत्रकार संघ व टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी सुमन चंद्र व जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील, भुजबळ यांना निवेदन व्दारे करण्यात आली आहे. यावर आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिले आहे.

निवेदनावेळी शहरातील राजेंद्र काळे (राज्य उपाध्यक्ष, अखील भारतीय मराठी पत्रकार परिषद), अरुण जैन (जिल्हाध्यक्ष,जिल्हा पत्रकार संघ), चंद्रकांत बर्दे (कार्याध्यक्ष,जिल्हा पत्रकार संघ) आणि सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound