वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील मायलेक जखमी

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाट्याजवळ  वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील मायलेक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी रविवार, १७ सप्टेंबर रोजी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

भुसावळ शहरातील अयान कॉलनी येथे हैदर अली कासीम सैय्यद वय २५ हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो, हैदर हा कामानिमित्ताने ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्याच्या एम.एच. १९ डीसी ६६२२ या क्रमांकाच्या दुचाकीने आईला सोबत घेवून जळगाव येथे आला होता, काम आटोपून पुन्हा भुसावळकडे जात असतांना, एम एच १९ सीएन ४२१६ या क्रमाकांच्या वाहनाने हैदरच्या दुचाकीला धडक दिली, धडक एवढी जोरदार होती की या धडकेत हैदर व त्याची हे  दोन्हीही दुचाकीवरील फेकले गेले, या अपघातात हैदर याच्या हाताचे हाड मोडले असून त्याच्या आईच्या पायाला कमरेला व मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आहे. यात दुचाकीचेही नुकसान झाले आहे, या अपघातप्रकरणी सहा दिवसानंतर हैदर याने रविवारी नशीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन म एच १९ सीएन ४२१६ या क्रमाकांच्या वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख हे करीत आहेत.

Protected Content