वेगवेगळ्या कारणांवरून विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दिनकर नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात रविवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील दिनकर नगरातील रहिवासी नूतन पंकज बाविस्कर यांचा चोपडा तालुक्यातील मामलदे येथील येथील पंकज नवल बाविस्कर यांच्याशी विवाह झाा आहे, लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यावर नूतन हिचा तिचे पतीसह सासरच्यांनी वेगवेगळ्या कारणांवरुन वेळावेळी शिवीगाळ तसेच मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला, या छळाला कंटाळून नुतन ही जळगावात माहेरी निघून आली व तिने या छळाबाबत रविवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन नूतनचे पती पंकज बाविस्कर, सासरे नवल सिताराम बाविस्कर, सासू खटाबाई नवल बाविस्कर, सर्व रा. मामलदे, ता चोपडा , मावस सासू आशाबाई रामचंद्र कोळी रा, खेडी आव्हाणा अशा पाच जणंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर हे करीत आहेत.

Protected Content