यावल येथे शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तिथीप्रमाणे साजरी होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ. विवेक अडकमोल तर उपाध्यक्षपदी स्वप्निल करांडे यांची निवड करण्यात आली.

राज्यात १० मार्च २०२३ ला तिथी प्रमाणे साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने यावल येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यालयात शिवजयंती तिथेप्रमाणे उत्सवानिमित्त शिवजयंती महोत्सव उत्सव समितीचे कार्यकारणी गठीत करण्यात आली. शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विवेक वासुदेव अडकमोल तर उपाध्यक्ष म्हणून स्वप्निल करांडे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय खजिनदार म्हणून सचिन कोळी यांची निवड करण्यात आली. या बैठकीला मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते उपसथित होते. शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, शरद कोळी, सागर देवांग, सुनील वारी, पप्पू जोशी, जितु फालक, योगेश राजपूत, योगेश चौधरी, अजहर खाटीक, विजु कुंभार, पिंटू कुंभार यांच्यासह मोठया संख्येत शिवसेना ( ठाकरे गट ) पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

Protected Content