मुंदडा ग्लोबलच्या विद्यार्थ्यांनीचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश 

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धामध्ये एन.टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यूव स्कूल, अमळनेर येथील पूर्वशी संजय पाटील व पूर्वा चौधरी विजयी झाल्या आहेत.

नाशिक येथे होणारे शालेय विभागीय स्तरिय कराटे स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. १४ वर्षाआतील मुलींमध्ये ४६ किलो वजन गटात पूर्वा विनोद चौधरी व +५० किलो वजन गटात पूवर्शी संजय पाटील यांनी सुवर्ण पदक पटकावले. या सर्व खेळाडूना शाळेतील क्रिडा शिक्षक विनोद पाटील, पंकजराव पाटील, हेमंत जाधव व यज्ञेश जगताप,सुनील करंदीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन छाया मुंदडा, सहसचिव योगेश मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, ऍडमिनिस्ट्रेटर दीपिका अमेय मुंदडा, नरेंद्र मुंदडा, राकेश मुंदडा, पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य लक्ष्मण लजपथ, प्रायमरी प्राचार्या विद्या लक्ष्मण, प्री प्रायमरी को ऑडीनेटर योजना ठक्कर आदींनी दोघांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content