यावल महाविद्यालयात अग्निरोधक कार्यशाळा संपन्न

यावल प्रतिनिधी | येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अग्निरोधक बंब वाहून नेणे व हाताळणे विषयी कार्यशाळा संपन्न झाली.

मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील डॉ.किरण पवार यांनी याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘अग्निरोधक’ या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. ए. पी .पाटील, प्रा एस आर गायकवाड, डॉ भंगाळे, प्रा आर डी पवार, डॉ एस. पी. कापडे तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डी एन मोरे, सी के पाटील, मनोज पाटील, प्रवीण पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठया संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी या कार्यशाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या अग्निरोधक मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा ए पी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या घेण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content