मनोज जरांगेंचे मुंबईकडे कूच : निर्वाणीच्या लढाईचा इशारा

छत्रपती संभाजी महाराज नगर-वृत्तसेवा | मराठा आरक्षणासाठी आधी जाहीर केल्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना सोबत घेऊन आज मुंबईकडे प्रयाण केले आहे.

मनोज जरांगे पाटील हे हजारा समाजबांधवांना सोबत घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. त्यांनी मुंबईला निघण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाहीये. पण मी असो किंवा नसो मराठ्यांची एकजूट मोडू नका. आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे. आमचं आंदोलन मुंबईत पोहचल्यावर कोट्यवधी मराठे मुंबईत दिसणार आहेत. ही आरपारची लढाई आहे कुणी घरी राहू नका अशी माझी मराठा बांधवांना विनंती आहे असे ते म्हणाले.

दरम्यान, आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Protected Content