बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह !

मुंबई (वृत्तसंस्था) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा काल रात्री उशिरा कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

 

बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले होते. थोरात यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली होती. परंतू बाळासाहेब थोरात यांना आता दिलासा मिळाला असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. मात्र खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन व्हायचे ठरवल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करुन दिली होती. याआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.

Protected Content