पाल परिसरात श्रीराम पाटील यांची प्रचार फेरी !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आदिवासी बहुल भागात रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी प्रचार फेरी काढली. यात त्यांनी आदिवासींच्या समग्र विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.

पाल येथे श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. यात रावेर लोकसभा मतदार संघातील आदिवासी बांधवांच्या सर्वागीण विकासासाठी भावी काळात केंद्र सरकारच्या योजना यशस्वीपणे राबवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील याची दिले .

रावेर लोकसभा मतदार संघातील आदिवासी पट्ट्यात रस्त्यांचे जाळे आधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान सडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करू. तसेच आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या सामूहिक व वैक्तिक लाभाच्या असलेल्या योजना प्रभावीपणे राबवू असे आश्वासन श्रीराम पाटील यांनी दिले. उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांना रावेर तालुक्यातून आदिवासी पट्ट्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रचार फेरीत आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, दारा मोहम्मद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, राजीव सवर्णे, दिलरुबाब तडवी, लक्ष्मण मोपारी, मोरव्हालचे उस्मान तडवी, सरफराज तडवी, हनिफा तडवी, पाल येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हमीद तडवी, कामील तडवी, रौनक तडवी, संजय पवार, गणेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content