नांदुर्‍यात लव्ह जिहाद विरोधी भव्य मोर्चा

नांदुरा-पुरूषोत्तम भातूरकर | येथे आज लव्ह जिहादच्या विरोधात भव्य मोर्चा तहसीलवर धडकला. यात हजारो आबालवृध्द सहभागी झाले.

नांदुरा शहर व तालुक्यात हिंदू धर्मीयांच्या विरोधात सुनियोजित पद्धतीने गझवा-ए-हिंद घ्या कारस्थाना अंतर्गत लव जिहादचा कट रचून हिंदू मुली जाणिपूर्वक लक्ष्य केल्या जात आहेत. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढुन त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करून धर्मातरीत करण्यात येत आहे. पंधरा दिवसाच्या कार्यकाळामध्ये तालुक्यातील अशी तीन प्रकरणे घडली आहेत. याच्याच विरोधात आज शहरातून विराट मोर्चा काढण्यात आला.

नांदुरा शहरात विराट मोर्चा काढण्यात आला व शहरात बंद पाळण्यात आला. बंद मध्ये सहभागी होऊन २० हजारच्यावर नागरिकांनी आपली मोर्चामध्ये उपस्थिती दर्शवून हिंदू एकतेचे दर्शन घडविले. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठया प्रमाणावर दिसून येत होती. सदर मोर्चा हा नांदुरा नगरीतील इतिहासात नोंद होणार आहे.असा होता सकाळी ११ वाजता जबलेश्वर महादेव मंदिर नांदुरा खुर्द येथून मोर्चा प्रारंभ झाला नांदुरा शहरातील सर्व दुकानदारांनी आपली प्रतिष्ठितने दुकान १००% बंद ठेवुन मोर्चामध्ये सामील झाले. शहरात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

सदरचा मोर्चा शांततेत संपन्न झाला. नांदुरा खुर्द, नांदुरा पुलावरून गांधी चौक, उस्मानिया चौक, नापरखेडी, छञपती शिवाजी पुतळा स्टेशन रोड, राष्ट्रीय महामानि तहसील कार्यालय येथे पोहोचून तसीलदार यांना निवेदन देण्यात आले अनेक नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाला संबोधित केले. तहसीलदार यांना निवेदन देतेवेळेस मा. आमदार चैनसुख संचेती,बलदेवराव चोपडे सह भारतीय जनता पार्टी नांदुरा शहर व तालुक्याचे शिवसेना शहर व तालुका, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,रिपाई, आठवले गट, सकल हिंदू समाज संघटना व संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Protected Content