धनराज पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिचर्डे येथील पत्रकार तथा निसर्गप्रेमी धनराज पाटील यांना  छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी पिचर्डे येथील पर्यावरण प्रेमी,निसर्ग मिञ व पत्रकार  धनराज भिकन पाटील यांची निवड झाली असून या बाबत निसर्ग मित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे ,डी.बी. पाटील यांचे  पत्र प्राप्त झाले आहे.

 

या पत्रात म्हटले आहे की, सामाजिक,शैक्षणिक, कृषी व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने व निसर्ग मित्र समितीचा वर्धापन दिनी आपली छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे.   १८ जून रविवार रोजी देवपूर धुळे या ठिकाणी आयोजीत कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या बद्दल धनराज पाटिल यांचे सर्व स्तरातून  अभिनंदन होत आहे.

Protected Content