तांदळी येथील प्रौढ इसमाचा करूण अंत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील तांदळी येथील 52 वर्षीय इसमाने स्वतःचा शेतात कडू लिंबाचा झाडाला दोरीने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आहे.

 

कैलास पौलाद चौधरी वय(52)यांचे मुळगाव नीम,तर ह.मु. तांदळी (मयताचे सासर)असे आत्महत्या केलेल्या व्यक्ती चे नाव असून सदरची घटना 24 मार्च रोजी दु.साडे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

 

दरम्यान आत्महत्या करीत असल्याचे आधी दूरध्वनी वरून कळविले आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.कैलास पाटील काही काळ सरपंच पदी देखील राहून चुकले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस किशोर पाटील हे करीत आहेत. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content