डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय व गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील येथील गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धमार्थ रूग्णालयात सारा हॉलमध्ये योगशिक्षक योगेश पाटील यांनी प्रशिक्षण दिले. वैद्यकिय अभ्यासक्रमाचे सर्व विदयार्थी यावेळी उपस्थित होते.

 

विदयार्थ्यांनी योगा व्यायामाचे प्रात्यक्षिकही सादर केले. यावेळी मान्यवरांनी योगादिनाचे महत्व विषद करून सांगीतले. अधिष्टाता डॉ. एन एस आविर्र्कर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ. विठठल शिंदे,क्रिडा संचालक रितेश तायडे यांचेसह सर्व विभागाचे प्रमुख डॉक्टर व प्राध्यापक तसेच कर्मचारी उपस्थीत होते. डॉ उल्हास पाटील कॉले ऑफ फिजिओथेरेपी येथे वसुधैव कुटुंबकम् साठी योग या थीम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

 

यावेळी योगशिक्षक योगेश पाटील व सहकाऱ्‍यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांचेसह डॉक्टर व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होेते. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे वसुधैव कुटुंबकम् साठी योग या थीम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे योगशिक्षीका सरला साठे यांनी प्रशिक्षण दिले. महाविद्यालयाच्या मैदानात (किवा तेवन) मध्ये योग सत्र झाले. सर्व विद्यार्थी. कार्यक्रमात नर्सिंग सहभागी झाले होते. सत्राची सुरुवात सकाळी ७.०० वाजता वॉर्मअप आणि सूर्यनमस्काराने झाली. योगशिक्षिका श्रीमती सरला साठे यांनी सत्राचे नेतृत्व केले.

 

योग दिन आणि आपल्या दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व याविषयी त्यांनी माहिती दिली.प्राचार्यानी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्पत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. अर्थात, योग ही एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे जी भारतात उगम पावली आहे. उपप्राचार्य विशाखा वाघ, एम.एस. यांच्या निरीक्षणाखाली योग दिनाचा सोहळा यशस्वीपणे पार पडला. स्त्रीरोग विभाग प्रमुख मेनाओ के सह प्राध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय येथेही योगा दिन साजरा करण्यात आला.

Protected Content