जळगाव, प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटी संचलीत ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची आॅनलाईन कार्यशाळा नुकतीच झाली .कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा ज्या पद्धतीने भरते आहे त्यावर चर्चा करण्यात आली.
इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन टेस्ट झाली. त्या परिक्षेला पालकांचा मिळालेल्या उत्तम प्रतिसादाचे मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांनी कौतुक केले. तसेच मायक्रोसॉफ्ट टिम्सच्या माध्यमातून आॅनलाईन वर्ग कसे घ्यायचे याविषयी मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्यकेटीव्ह एक्सपोर्ट एम.एस.नेमाडे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे फीडबॅक कसे घ्यायचे , असाईनमेंट कसे द्यायचे याविषयी सविस्तर सांगितले .याप्रसंगी शिक्षकांच्या शंकाचे निरसन केले. कार्यशाळेला सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.