जामनेर नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष साधना महाजन यांचा गौरव

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या कार्यकाल संपला असून नगरपालिका प्रशासनातर्फे नगराध्यक्ष साधना महाजन व नगरसेवक यांना निरोप देण्यात आला.

 

यावेळी शहरात मोठ्या प्रमाणावर विकास केल्याबाबत शहरवासी तर्फे नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या सन्मान करण्यात आला यावेळी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील, भगवान सोनवणे, लीना पाटील, शितल पोळ, सुनंदा माळी, रिजवान शेख यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

जामनेर नगरपालिकेचा कार्यकाळ संपला असून नगराध्यक्ष सौ साधना महाजन यांच्यासह नगरसेवक यांचा नगरपालिका प्रशासन तर्फे निरोप देण्यात आला. यावेळी सर्व सन्माननीय नगरसेवक नगराध्यक्ष यांचा नगरपालिका तर्फे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सन्मान केला.

 

यावेळी नगरसेवकांनी गेल्या पाच आलेले अनुभव कथन केले. त्यामध्ये रिजवान शेख यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून मुस्लिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला असून विकास कामे झाली आहे असे सांगितले. तर महेंद्र बाविस्कर यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना व्यक्त केली.

Protected Content