चार वाहनांच्या सायलेंन्सरची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील अजिंठा रोडवर असलेल्या मानराज मोटर्स समोरील मोकळ्या जागेतून चार चारचाकी वाहनांचे ८० हजार रुपये किंमतीचे सायलेंन्सर लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील शारदा शाळेजवळ दिनेश भगीरथ पाटील (वय-४३) हे वास्तव्यास असून ते वर्कशॉपमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. त्यांनी अजिंठा रोडवरील मानराज मोटर्सच्या समोर असलेल्या मोकळ्या प्लॉटमधून १२ एप्रिल ते २६ मे रोजी दरम्यान चार मारुती इको वाहन पार्किंग करून लावले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वाहनाचे ८० हजार रूपये किंमीचे चार सायलेंन्सर चोरुन नेले. हा प्रकार घडल्यानंतर दिनेश पाटील यांनी शनिवारी २४ जून रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ अतुल वंजारी हे करीत आहे.

Protected Content