गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी

जळगाव प्रतिनिधी ।  गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल गुरूपौर्णिमानिमित्त महर्षी व्यास ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानिमित्ताने ऑनलाईन पद्धतीने व्हीडीओद्वारे गुरुशिष्याचे महत्व सांगितले.

यावेळी मुख्याध्यापिका निलिमा चौधरी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा…गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्‍ती… गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य… गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक…. आपल्या जीवनात गुरुंना अनन्य साधारण स्थान आहे,अशा भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर आज लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमत्‍त टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ऑनलाईन पद्धतीने व्हीडीओद्वारे गुरुशिष्याचे महत्व सांगितले. तसेच भेटकार्ड, श्लोक सादर करुन गुरुंबद्दलचे ऋण व्यक्‍त केले. संगीत शिक्षीकांच्या गीत-गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षकांनी संत कबीर यांचे गुरुंचे महत्व सांगणारे दोहे म्हटले. तसेच उपस्थीतांनी मनोगत व्यक्‍त केले. मुख्याध्यापिका निलीमा चौधरी यांनी गुरुंचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्‍त केले. 

Protected Content