लोन देण्याचे आमिष दाखवत लाखोंची फसवूणक करणाऱ्या तीन ठगांना उत्तर प्रदेशातून अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आदर्श नगरात राहणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्ती आणि भडगाव शहरातील तरूण यांना पॉलीसीद्वारे पैश्यांचे आमिष दाखवत अनुक्रमे सुमारे ४५ लाख ५० हजार ८८१ आणि १ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना सायबर पोलीसांनी दिल्ली व उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुष्पेंदरकुमार रामदिन कनौजिया (वय-२९) रा. ऑफीसर कॉलनी, नवाबगंज, कानपूर ह.मु. गणेश चौक मंडावली दिल्ली, राहूल दिनेशकुमार पांडे (वय-२९) रा. विश्व बँक कॉलनी कानपूर, उत्तर प्रदेश, आणि रूपेश कुमार गिरीजानंद (वय-३३) रा. आचार्य निकेतन मयुर विहार, दिल्ली अशी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत. 

सविस्तर माहिती अशी की, पहिल्या घटनेत प्रमोद कुमार मुगतलाल शाह (वय-७६) रा. आदर्श नगर यांना १८ ऑगस्ट २०१९ ते ०२ डिसेंबर २०२० दरम्यान मितेश कुमार, अशोक कुमार सिंग आणि एमटीसिंग असे नावे सांगून प्रमोद शाह यांना मोबाईलवर मिनीस्ट्री ऑफ फायनान्स व आयकर विभाग भारत सरकार येथून बोलत असल्याचे सांगून  पॉलीसीद्वोर ९४ लाख ६९ हजार ८६४ रूपये मिळण्याचे आमिष दाखवत सुमारे ४५ लाख ५० हजार ८८१ रूपये ऑनलाईन स्विकारून फसवणूक केल्याचे उघडकीला आले होते. तर दुसऱ्या घटनेत सैय्यद अलिम सैय्यद शौकत पटवे (वय-३४) रा. यशवंत नगर भडगाव जि.जळगाव या तरूणाला देखील १९ जानेवारी २०१९ ते ६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान चार जणांनी वेगवेगळे नावे सांगून बजाज फायनान्स कंपनी पॉलीसीचे बनावट कागदपत्रे बनवून पॉलीसी लोन देण्याच्या नावाखाली सैय्यद अलिम यांच्याकडून वेळोवेळी १ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक केली. या दोन्ही घटनेबाबत सायबर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी तपासादरम्यान फिर्यादी यांना आलेले ईमेल, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक यांचा अभ्यास केला. त्यांनी पुष्पेदर कुमार रादिन कनौजिया हा निष्णन्न झाला. त्याला १२ जुलै २०२१ रोजी दिल्लीतून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने राहूल पांडे आणि रूपेश कुमार या दोघांची नावे सांगितली. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने व पोलीस नाईक दिलीप चिंचोले यांनी संशयित आरोपी राहुल पांडे दिनेशकुमार पांडे व रूपेश कुमार गिरीजानंद हे ग्रेटर नोयडा उत्तरप्रदेशात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक करण्यासाठी पोउनि अंगत नेमाने, पाहेकॉ प्रविण वाघ, पो.ना. दिलीप चिंचोले, पो.कॉ. अरविंद्र वानखेडे, पो.कॉ. पंकज वराडे, पोकॉ. गौरव पाटील यांचे पथक असे १८ जुलै २०२१ रोजी उत्तरप्रदेशात रवाना केले. राहूल पांडे याला कानपूरहून तर रूपेश कुमार याला दिल्लीतून अटक केली. यात रूपेश हा दिल्ली येथे बनावट कॉल सेंटर चालवत असल्याचे समोर आले. 

तिनही संशयित आरोपींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायालयाने २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

Protected Content