असंख्य गीतांमधूनअजरामर राहणार प्रतापसिंग बोदडे !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समतेचा नारा बुलंद करणार्‍या असंख्य गाण्यांमधून भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे हे अजरामर राहणार असल्याची आदरांजली मान्यवरांनी येथे व्यक्त केली. जळगावात त्यांच्या कार्याचे स्मरण करत या महान कलावंताला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

नुकतेच काळाच्या पडद्याआड गेलेले भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांना जळगावात अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, सुरेश सोनवणे, मुकुंद नन्नवरे, मिलिंद पवार, शालिक गायकवाड, कुणाल बोदडे, धुडकु सपकाळे, सचिन धांडे, दिलीप सपकाळे, राजू सवरणे, अशोक बाविस्कर, सुरेश तायडे, सुजाता इंगळे, माया अहिरे, चंदन बिर्‍हाडे, अमोल कोल्हे, रमेश सोनवणे, उमेश गाढे, सुषमा भालेराव, हरिश्चंद्र सोनवणे, महेंद्र केदार श्रीकांत बावीस्कर, सुभाष साळुंखे, सोमा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संतोष गायकवाड, बाबुराव वाघ यांनी बुद्ध वंदनेने केली. प्रास्ताविक डॉ.मिलिंद बागुल यांनी तर सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी केले. यानंतर विविध कलावंतांनी प्रतापसिंग बोदडे यांनी गाणी सादर केली. यात समाधान जोगी, अशोक जोगी (एकलग्न), मनोहर तायडे (रावेर), शरद भालेराव (जळगाव), सपना खरात (अकोला), भास्कर अमृत सागर (धुळे), प्रकाश वानखेडे (अमरावती), किशोर वाघ (औरंगाबाद), विनोद आठवले (अकोला), ललकार भाऊ वानखेडे (नांदेड), सखाराम हिलोडे (मुक्ताईनगर), रवींद्र निकम , भैयासाहेब , दिनकर संसारे (चाळीसगाव), संघपाल तायडे या कलावंतांचा सहभाग होता.

महापौर जयश्रीताई महाजन यांनी प्रतापदादांच्या कार्याचा गौरव केला. तर, मुकुंद सपकाळे यांनी प्रतापसिंग बोदडे यांच्या गीतांच्या पुस्तकांच्या एक लाख प्रती छापण्याचे जाहीर केले.

प्रास्ताविक डॉ.मिलिंद बागुल यांनी तर सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी केले. यात विविध कलावंतांनी प्रतापसिंग बोदडे यांनी गाणी सादर केली. आभार प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी मानले.

Protected Content