घरासमोर लावलेली कारची चोरी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर शहरातील गिरजा कॉलनी परिसरातून कारची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या बाबत शनिवारी ६ मे रोजी रात्री ८ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमित सुरेश सैतवाल (वय-४०) रा. गिरजा कॉलनी, जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी चारचाकी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे (एमएच १९ व्हीजे ४५५७) क्रमांकाची इको कार आहे. ५ मे रोजी रात्री ८ वाजता अमितने त्याची कार ही घराच्यासमोर पार्क करून लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली कार चोरून नेल्याचे शनिवारी ६ मे रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. कारची चोरी झाल्यानंतर अमितने सर्वत्र शोध घेतला परंतू कार संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ६ मे रोजी रात्री ९ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश अमोदकर करीत आहे.

Protected Content