घरातील कपाटातून ७० हजाराची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगरातील मिर्झा चौकातील उघड्या घरातील कपाटातून ७० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १९ मार्च रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शेख अकिकल शेख सलीम (वय-२८) रा. मिर्झा चौक, शिवाजी नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ईलेक्ट्रीक फिटींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेख अकिकल हे घरी असतांना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून कपाटात ठेवलेले ७० हजारांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले. हा प्रकार त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घरात सर्वत्र शोध घेतले परंतू पैशांची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १९ मार्च रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.

Protected Content