ब्रेकींग : राज्य कर्मचाऱ्यांचा संप मागे : जुनी पेन्शनबाबत शिंदे सरकारचं आश्वासन !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे हा संप मागे घेत असल्याची घोषणा संपातील समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.

राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. तो मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यातील अवकाळीमुळे जी कामे प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर रहावे असे आवाहन देखील कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी गेल्या सात दिवसांपासून संप सुरू होता. संपकऱ्यांच्या या मागणीसाठी राज्य सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली असून येत्या तीन महिन्यात त्याचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यामुळे हा संप मागे घेत असल्याची घोषणा संपातील समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.

Protected Content