कोळी समाजाचा सामुहिक सोहळ्याचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोळी समाज विकास मंच मार्फत १४ मे रोजी रविवारी पाचव्या सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

आमदार रमेश पाटील यांचा अध्यक्षतेखाली या भव्य सामुहीक विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रमेश पाटील भुषाविणार असून ,माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या हस्ते आद्यकवी महर्षि वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे. गणेश पुजन दिपनगरचे पँनल प्रमुख रामचंद्र तायडे यांचा हस्ते करणात येणार आहे.

या सामुहीक विवाह सोहळ्याचे शुभारंभ दिपप्रज्वलन महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री ना .गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खा.रक्षा खडसे, आ.शिरीष चौधरी, आ. संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार एकनाथ खडसे, आ,चद्रकांत पाटील, लिलाबाई सोनवणे यांचाहस्ते करण्यात येणार आहे.

आ.लताताई सोनवणे, शिवसेना उपनेते शरद कोळी, माजी समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, सेवानिवृत वैद्यकीय अधिकारी डाँ शांताराम सोनवणे, परेशभाई कोळी, जळगाव जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, वाल्मिकराजचे संपादक अजय कोळी, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्याहस्ते करण्यात येत आहे.

पिंप्री फाटा दिपनगर येथे आयोजीत कार्यक्रम दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी संपन्न होणाऱ्या या सामुहीक विवाह सोहळ्यात दहा वधु -वरांचे शुभमंगल होणार असून , सदरचे कार्यक्रम कोळी समाज विकास मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुहीक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी आयोजक करीत आहे.

या सोहळ्याचे यशस्वी करण्यात साठी मुख्य आयोजक नारायण कोळी, साकरी समीतीचे अध्यक्ष अनिल तायडे उपाध्यक्ष कीशोर सपकाळे, सचिव गजानन तायडे ,सहसचिव मोहन कोळी ,लक्ष्मण कोळी,गणेश तायडे , दिपक पाटील, संजय तायडे , रामचंद्र तायडे ,देविदास कोळी व समाज बांधव परीश्रम घेत आहे. या सामुहीक विवाह सोहळ्यास समाज बांधवांच्या उपस्थितीचे आवाहन कोळी समाज विकास मंच आयोजित पदाधिकारी व समस्त कोळी समाज बांधवांनी केले आहे.

Protected Content