विजयादशमीनिमित्त रामानंद नगर पोलीस स्थानकात शस्त्रपूजन (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 08 at 12.12.27 PM

जळगाव प्रतिनिधी । विजयादशमीनिमित्त आज सकाळी रामानंद नगर  पोलीस स्थानकात शस्त्रपूजन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामानंदनगर पोलिस स्थानकातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

आज विजयदशमीनिमित्ताने शस्त्र पूजन केले जाते. यानुसार रामानंद नगर पोलीस स्थानकातील शस्त्रांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी रामानंदनगर पोलिस स्थानकातील पीएसआय कांचन काळे, ठाणे अंमलदार विश्वनाथ गायकवाड, मुन्शी प्रमोद पाटील, पोहेकॉ विलास पवार, रवींद्र चौधरी, सुनील पाटील, गणेश देसले, जितेंद्र तावडे, महिला कॉन्स्टेबल निलोफर सय्यद, स्वाती पाटील, सुभाष सोनवणे, रवी नरवाडे आणि पोहेका इंद्रेकर आदि कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content