जिल्ह्यात आज ९२१ कोरोना बाधीत; जळगाव, चोपडा, एरंडोल, धरणगावात सुसाट

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज देखील नऊशेच्या पार अर्थात ९२१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरासह चोपडा, एरंडोल आणि धरणगावातील संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर- २७०, जळगाव ग्रामीण-६३, भुसावळ-३२, अमळनेर-०, चोपडा-१८१, पाचोरा-१९, भडगाव-१२, धरणगाव-६१, यावल-१८, एरंडोल-१२२, जामनेर-६७, रावेर-५, पारोळा-२४, चाळीसगाव-४३, मुक्ताईनगर-२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातून १ असे एकुण ९२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ७५ हजार ४१५ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६४ हजार ७१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार २२३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहर, भुसावळ आणि चोपडा तालुक्यातून प्रत्येकी २ तर धरणगाव तालुक्यातील १ असे सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर १ हजार ४७४ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

Protected Content