किरकोळ कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून घातला वाद

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दुधगाव येथील तरुणाला नवीन घराचे बाथरूमला पाण्याचे पाईप लावण्याच्या कारणावरून चौघांकडून जणांकडून शिवीगाळ करून वाद घातल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात सोमवारी १९ जून रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश एकनाथ सैंदाणे (वय-३८) रा. दोधगाव ता. अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याने नवीन घर बांधले असून त्या घराचे बाथरूमचे पाण्याचे व सांडपाण्याचे पाईप कनेक्शन जोडत असताना १८ जून रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या गल्लीत राहणाऱ्या मंगलाबाई ज्ञानेश्वर पाटील, सरलाबाई ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर दलपत पाटील आणि कमलबाई भटू सिंग राजपूत सर्व रा. दुधगाव ता.अमळनेर यांनी शिवीगाळ करून वाद घातला. हा प्रकार घडल्यानंतर योगेश सैंदाणे याने मारवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी १९ जून रोजी रात्री १० वाजता चौघांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील हे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.

Protected Content