Home क्राईम दुचाकीच्या धडकेत चहा विक्रेता तरूण जखमी

दुचाकीच्या धडकेत चहा विक्रेता तरूण जखमी

0
104


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरातील पोलन पेठ येथे एका चहा विक्री करणाऱ्या तरुणाला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हातापायाला दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोमवारी १९ जून रोजी दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विशाल कैलास राजपूत (वय-३५, रा. बालाजी पेठ, जळगाव) हा तरुण चहा विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याचे पोलन पेठ दाण बाजारातील गोपाल मसाल्याच्या दुकानासमोर चहा दुकान आहे. त्यावर आपला उदररिर्वाह करतो. १० जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विशाल राजपूत हा चहा करत असतांना (एमएच १९ डीएफ ३७८७) ने जोरदार धडक दिली. या धडकते विशाल याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीधारक हा दुचाकी सोडून पसार झाला. उपचार घेतल्यानंतर विशाल राजपूत याने सोमवारी १९ जून रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दुचाकीधारकारवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहे.


Protected Content

Play sound