काँग्रेस असंघटित कामगार कमेटीच्या प्रदेश समन्वयकपदी प्रसन्ना देशमुख यांची नियुक्ती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील नायगाव येथील प्रसन्न गुणावंतराव देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या असंघटीत कामगार कर्मचारी कमेटीच्या प्रदेश समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राष्ट्रीय कॉंग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे यांनी नायगाव तालुका यावल येथील प्रसन्न गुणवंतराव देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस कमेटीवर नियुक्त करण्यात आले. प्रसन्न देशमुख यांच्या नियुक्तीचे माजी खा.डॉ. उल्लास पाटील, रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रदीप पवार, यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील, खरेदी विक्री संघाचे अमोल भिरुड, प्रदेश सधिव जलील पटेल , उमेश जावळे, अजय बढे, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, तालुका उपाध्यक्ष, हाजी गफ्फार शाह, यावलचे माजी उपनगराध्यक्ष अस्लम शेख नबी , माजी पंचायत समिती उपसभापती उमाकांत रामराव पाटील यांच्यासह आदींनी स्वागत केले आहे .

Protected Content